15 November 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

देवेंद्र फडणवीस यांच्यावर RSS संबंधित ‘या’ संस्थेची नवी जबाबदारी

Rashtriya Swayamsevak Sangh, Devendra Fadnavis

मुंबई, १३ मार्च: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis has been elected as the president of Rambhau Mhalgi Prabodhini)

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leader and Leader of the Opposition in the state assembly Devendra Fadnavis was at the center of the discussion in the budget session of the legislature. Similarly, Devendra Fadnavis has been given another new responsibility. Devendra Fadnavis has been elected as the president of Rambhau Mhalgi Prabodhini, an organization affiliated to the Rashtriya Swayamsevak Sangh.

News English Title: Devendra Fadnavis has been elected as the president of Rambhau Mhalgi Prabodhini news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x