फडणवीस म्हणाले केंद्राने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली | कोर्ट म्हणालं होतं बुद्धीचा जराही वापर केला नाही

नाशिक, ३० एप्रिल | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयास भेट देऊन, नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतच असतो, केंद्र सरकारने रेमडेसिविरचा सर्वाधिक साठा हा राज्याला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला. जवळ जवळ पहिल्याच खेपेत ११०० व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला दिले. आता पीएसए प्लॅन्ट देखील मोठ्याप्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव अशा प्रकारची अवस्था नाही.
केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली आहे. तीच राज्याने देखील केली पाहिजे. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितलं आहे की आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. म्हणून माझंही मत स्पष्ट आहे कोणी कुणाकडे बोट दाखवणं योग्य नाही, आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आपण करायला हवा.
दरम्यान, कोरोना आपत्तीत फडणवीसांकडून केंद्राची पाठ थोपटण्याचा प्रकार घडला असला तरी न्यायालयाने मात्र अगदी त्याविरुद्ध मत नोंदवलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राने केलेल्या व्यवस्थेवरून आणि नियमांवरून कडक शब्दात ताशेरे ओढले होते. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना, ‘हे चुकीचं आहे. नियम बनवता बुद्धीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही असं वाटतंय. ज्यांच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाहीय अशा ठिकाणी रेमडेसिविर औषध दिलं जाणार नाही. लोकांनी मरत रहावं अशीच तुमची इच्छा आहे, असं यावरुन वाटतंय,” असं मत नोंदवलं होतं.
News English Summary: The central government has set up a very rational system. The same should be done by the state. Frequent pointing to the center will not work. We all have to work together. Prime Minister Modi has repeatedly said that today we must stand together with the people. So my opinion is clear, it is not right to point the finger at anyone, we should make proper use of the resources available to us.
News English Title: Devendra Fadnavis press conference at Nashik over corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK