22 January 2025 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

भाजप चंद्रकांतदादांना पदावरून हटवणार? | भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर फडणवीसांनी दिली माहिती

Devendra Fadnavis

मुंबई, ०७ ऑगस्ट | पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची देखील चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीला जाऊन परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठकही झाल्याचंही बोललं जात आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दौऱ्यामुळं पडद्यामागे काही तरी घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांच्या गच्छंतीचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी आज याबाबत सविस्तर खुलासा केला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा सध्या जोरात आहे. पंकजा मुंडेही दिल्ली दरबारी दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी राज्यात भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षामध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नसल्याची माहिती दिलीय. तसंच ही दिल्लीवारी फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असल्याचंही फडणवीस म्हणाले. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. तसंच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी हा दौरा आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कृपया कांड्या पिटवू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मातंग, बोरड, चर्मकार, वाल्मिकी सुदर्शन समाजापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्गवारी करावी लागेल. आज आरक्षणानंतरही अनेक समाज मागे आहे. त्यामुळे दीर्घकाळ आरक्षण सुरु ठेवावं लागेल. जो वंचित समाज आजही आरक्षणापासून दूर आहे. त्यांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात घेता येईल याबाबत विचार सुरु असल्याचंही फडणवीस म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadnavis shared information over state BJP leaders Delhi visit news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x