26 December 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

भाजप हा मोठा पक्ष आहे | कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, Eknath Khadse, joining NCP

औरंगाबाद, २१ ऑक्टोबर : भाजपाचे नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम ठोकला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.”मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

यानंतर आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जे आरोप केले त्यावर वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल, असं सूचक विधान करत कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी खडसेंना लगावला आहे.

नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगलं झालं असतं. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या, असं सांगतानाच मला खडसेंच्या इतर आरोपांवर काहीही बोलायचं नाही. खडसे अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचं नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचं आहे, त्यांनी मला ठरवलं, असं ते म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो की मोठा नेता असो पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही, असा टोला लगावतानाच जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: Leader of the Opposition Devendra Fadnavis held a press conference while on tour and made a statement on the allegations leveled against him. Fadnavis has hit back at Eknath Khadse, who quit the BJP, accusing him of leaving the party because of Leader of the Opposition Devendra Fadnavis. Whether it is a party worker or a big leader, when he leaves the party, he definitely gets hurt. But BJP is a big party. Jalgaon district is the stronghold of the BJP. “People are with BJP,” he said.

News English Title: Devendra Fadnavis statement after Eknath Khadse joining NCP News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x