राजकीय ठोकताळा | केंद्रात मोदी तंत्र, तर राज्यात फडणवीस तंत्र | विरोधक आणि स्वपक्षीयांसाठी सुद्धा घातक? - वाचा सविस्तर
मुंबई, ०१ ऑगस्ट | देशातील राजकारणात आज मोठं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यात खरी भर पडली ती २०१४ नंतरच्या देशातील बदलेल्या राजकारणामुळे हे नव्याने सांगायला नको. सत्ता आल्यानंतर समाज माध्यमांच्या साहाय्याने अनेक विरोधकांच्या विरोधात एक क्रूर प्रचार राबवला गेला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण देखील घडल्याचं सामोरं आलं आणि अनेक माध्यमांचे लागेबांधे देखील समोर आले. मोदी विरोधक म्हणजे या देशाचे शत्रू असाच प्रचार सुरु केला गेला.
एका बाजूला देशभरात विरोधकांना संपविण्याची योजना राबवली गेली, तर दुसऱ्या बाजूला देशातील भाजप आपल्या हातात कशी राहील याची पूर्णपणे काळजी घेतली गेली. त्यासाठी मंत्रिमंडळात आपल्याला हवे तेच आणि आपल्यासमोर झुकणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांचीच वर्णी लावण्याची योजना आखली आणि अमलात देखील आणली. आज भाजप नावाचा पक्ष हा केवळ मोदी, शहा आणि पियुष गोयल या तीन गुजराती नेत्यांच्या हातात आहे. स्वतः व्यतिरिक्त मोठे केलेले दोन चेहरे देखील त्यांनी गुजरातीच निवडले आहेत. स्वपक्षात आपल्याला वरचढ ठरू शकतील अशा कोणत्याही भाजपमधील वरिष्ठ चेहऱ्यांना पुढे येण्याची संधीच दिली नाही. आज राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे नेते सुद्धा त्यांच्या विरोधात सत्य बोलण्याचं धाडस करणार नाहीत हे ढळढळीत सत्य आहे. मोदी सांगतील तीच पूर्वदिशा आणि त्यांच्या जयजयकार करतील अशा नेत्यांना मंत्रीपदी बसवलं आहे . राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना डावलून केंद्रीय गृहमंत्रीपद स्वतःच्या गुजरातपासूनच्या कट्टर समर्थकाला म्हणजे अमित शहांना बसवण्यात आलं. मोदींचं राजकीय तंत्र हे केवळ विरोधकांना नव्हे तर वरिष्ठ स्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणालाही पूर्णविराम देणारं ठरलंय.
देशातील विरोधकांविरोधात ED, CBI आणि आयकर विभाग नावाची शस्त्र:
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ED, CBI आणि आयकर विभाग किती व्यस्त आणि धडाडीने कामं करणाऱ्या केंद्रीय यंत्रणा आहेत हे देशाला कळलं आहे. देशात हजारो करोडोचा पक्ष निधी जमवणाऱ्या भाजपमध्ये अत्यंत गरीब नेते उरले आहेत आणि विरोधकांकडे पैशाच्या नद्या वाहत आहेत असा डेटाच जणू ED, CBI आणि आयकर विभागांना प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे भाजप संबंधित कोणत्याही मोठ्या निवडणुका पार पडल्या की ED’च्या धाडीचे प्रमाण अचानक वाढते हा इतिहास राहिला आहे. बरं एखाद्या ठिकाणी धाडीत जप्त झालेली रोकड जेवढी जाहीर केली जाते, तेवढीच रक्कम हाती लागलेली असते की वास्तविक रक्कम मोठी असते याची कोणतीही खात्री देता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत सत्ता जाणार नाही तोपर्यंत यामागील सत्य उघड होणार नाही, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात.
तेच तंत्र आता फडणवीस तंत्रामार्गे महाराष्ट्रात देखील:
देशात मोदींनी विरोधक आणि स्वपक्षीयांविरोधात जे तंत्र अवलंबलं तेच राज्यात देखील फडणवीस तंत्रामार्गे अवलंबलं आहे आणि यामागील राज्यातील कोणता भाजप नेता आहे हे वेगळं सांगायला नको, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. राज्यात सत्ता गेल्यानंतर तर त्यात अचानक मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झालं आणि फडणवीसांची राजकीय लॉटरी लागली. त्यानंतर मोदींनी आपला माणूस म्हणून राज्यात फडणवीसांना मुख्यमंत्री पदी बसवलं. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर स्वपक्षातील एखाद्या समाजाचा चेहरा (जातीचा) असणारे नेते म्हणजे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान तर दिलं, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या राजकीय प्रवासात एक स्लो पॉयझन सोडलं होतं, ज्याचे परिणाम आता दिसून आले आहेत.
त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडेंना देखील तिकीट नाकारत बाजूला केलं आणि ते देखील फडणवीसांच्या ‘मोदी तंत्रा’ सारखंच तंत्र होतं. मोदींनी देशातील भाजप कशाप्रकारे स्वतःच्या मुठीत घेतली, त्यांचा पुरेपूर अभ्यास फडणवीसांनी केल्याचं तज्ञ सांगतात आणि त्याच नितीमार्गाने ते राज्य भाजपातील पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांना शह देतं, केवळ त्यांच्या इशाऱ्यावर माना डोलवणाऱ्यांना शिल्लक ठेवताना दुसऱ्याबाजूला पक्षातील आयात नेत्यांना पुढे करत आहेत.
मनसेतून आलेल्या दरेकरांना थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी बसवत सुधीर मुनगंटीवार यांना शह आणि गिरीश महाजांनी मुठीत ठेवलं:
सत्ता गेल्यामुळे अर्थातच विरोधीपक्ष नते पद भाजपकडे गेलं. पण वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी मनसेतून आलेल्या प्रवीण दरेकरांना बसवून पक्षातील वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा प्रोटोकॉल मिळणार नाही याची काळजी घेतली. म्हणजे मनसेने ज्या दरेकरांना १३ आमदार असताना गटप्रमुखही बनवलं नाही, त्यांना फडणवीसांनी थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी बसवलं आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे ते देखील त्यांच्या इशाऱ्यावर काम करतील तसेच दरेकर हे कोणत्याही समाजाचा चेहरा म्हणून राज्याच्या राजकरणात ओळखीचे नाहीत. त्यामुळे भविष्यत देखील अडचण येणार नाही. तसेच आपले समर्थक मुंबई सहकार क्षेत्रात (मुंबई बँक) बसवून तेथेही बस्तान बसवता येईल.
स्वतःची प्रतिमा जपायची आणि गरळ ओकणारी फौज पुढे करायची:
मोदी कोणत्याही सार्वजनिक संवादात आपली प्रतिमा क्लीन ठेवण्याचं तंत्र नेहमीच अवलंबतात. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तिखट आणि गरळ ओकणारी प्रतिक्रिया देत नाही, कारण त्यामुळे आपलीही प्रतिमा जनमानसात नकारात्मक होते हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी गरळ ओकणाऱ्या नेतेमंडळींना राज्यसभेवर खासदार, पक्षातील मोठ्या पदांवर किंवा प्रवक्तेपदी नेमून लक्ष करण्यात आलेल्या विरोधीपक्षातील नेत्यांविरीधात गरळ आणि खालच्या पातळीवरून टीका कशी करता येईल याची विशेष काळजी घेतली आहे. तोच कित्ता राज्यात फडणवीस नीतीतून अमलात आणला आहे. त्यासाठीच मूळ भाजपातील नेत्यांना डावलून पडळकर, निलेश राणे आणि अनेक नेत्यांना आमदारकी आणि पद देण्याचं तंत्र फडणवीसांनी अवलंबलं आहे, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी जे फडणवीस बोलू शकत नाहीत त्याची उणीव हे आयात नेते भरून काढतात.
दिल्लीत मोदींनी जसा भाजपांतर्गत स्वतःचा एक अघोषित गट निर्माण केला आहे. तोच प्रकार आज राज्यात फडणवीस नीतीतून पुढे आला आहे. १०६ आमदार असलेल्या पक्षाला एक ठराविक गट ऑपरेट करतो, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रवीण दरेकरां, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हाच तो राज्यातील फडणवीसांचा अघोषित गट असल्याचं राजकीय तज्ञ म्हणतात. जमिनीवरील कामांपेक्षा समाज माध्यमांवर वांरवार टिपण्या करून माध्यमांमध्ये भाजपचे चेहरे म्हणून प्रकाशझोतात राहणं, हाच या गटाचा उद्योग असल्याचं देखील अनेकदा निदर्शनास आलंय.
स्वपक्षातील एखाद्या समाजाचा (जातीचा) चेहरा असणारे नेते संपवायचे आणि सर्व जातीय समाजाचा चेहरा मीच हा भास निर्माण करायचा:
खडसेंना, पंकजा मुंडे आणि बावनकुळे या जुन्या ओबीसी चेहऱ्यांना राजकीय शह देत वंजारी आणि ओबीसी प्रवर्गातून येणारे भागवत कराड यांना थेट केंद्रीय मंत्रिपद देत मोदी सरकारने मोठी राजकीय खेळी ही फडणवीसांसोबत चर्चा करूनच केल्याचं म्हटलं जातंय. मराठा समाजाचे उदयनराजे यांना राज्यसभेरवर तर नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपदी बसवून हे चेहरे देखील आपल्या मुठीत ठेवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपमधील मराठा चेहरा असणारे विनोद तावडे यांना केवळ राष्ट्र्रीय पदाधिकारी बनवून त्यांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक दिला आहे. धनगर समाजाचा चेहरा आणि पंकजा मुंडेंचे समर्थक असलेले भाजपचे सहकारी महादेव जाणकर यांना शह देत गोपीचंद पडळकर यांना पुढे केलं आहे. परिणामी पुढे करण्यात आलेले ओबोसी, मराठा आणि धनगर समाजाचे हे नेते फडणवीसांचा जयजयकार करतात आणि त्यामुळे फडणवीस हेच सर्व समाजाचा चेहरा आहेत असा भास निर्माण केला जातो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Devendra Fadnavis strategy in state like Modi politics in India news updates.
ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करा: Click Here to Download
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती