22 January 2025 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते काय लिहतात | काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे - फडणवीस

Devendra Fadnavis, Amruta Fadnavis, Shivsena

मुंबई, २८ नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही,’ अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Opposition Leader Devendra Fadnavis Press conference) घेऊन हे स्पष्ट केलं. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणात कोर्टाने (Arnab Goswami and Kangana Ranaut court case) दिलेल्या निकालावरून राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय राज्यात सत्ता यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचंही कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांवरून स्पष्ट होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे निर्णय पुरेसे असले तरी आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जातोय, त्याबद्दल बोलायचं झाल्यास आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीच घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं कर याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात (Devendra Fadnavis’s wife Amruta Fadnavis) शिवसेनेचे अधिकृत नेते काय लिहतात, काय बोलतात हे सगळ्यांनाच माहितीये. पण मी त्याचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन, असा पलटवार त्यांनी केला आहे.

 

News English Summary: We are not attacking anyone’s home when it comes to the subject matter of the home. We never criticized the house. We have patience. The biggest example of tax criticism at home is myself. In the case of my wife (Devendra Fadnavis’s wife Amruta Fadnavis), everyone knows what the official leaders of Shiv Sena write and say. But I’m not calling it quits. I am in politics. “I will answer,” he retorted.

News English Title: Devendra Fadnavis talked about criticism on Amruta Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x