20 April 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

मुक्ताईनगनरमध्ये भाजपाला कार्यालयही शिल्लक नाही? | फडणवीसांवर नाथाभाऊंच्या घरीच बैठकीची वेळ

Devendra Fadnavis

जळगाव, ०१ जून |  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहेत. वादळाने ज्या भागाला तडाखा बसला त्या भागाची पाहणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान, काल (३१ मे) देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज थेट ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे गेले आहेत.

या दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुक्ताईनगर येथून केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. फडणवीसांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये नव्हते. ते मुंबईत आहेत. मात्र, फडणवीसांनी थेट खडसेंच्या घरी आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आरोपाचे खंडन केले होते. मात्र, नंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

 

News English Summary: State Opposition Leader Devendra Fadnavis is currently on tour. Devendra Fadnavis is inspecting the area hit by the storm. Meanwhile, Devendra Fadnavis had met NCP president Sharad Pawar yesterday (May 31). After that, today he has gone directly to Muktainagar of NCP leader Eknath Khadse.

News English Title: Devendra Fadnvis visited NCP leader Eknath Khadse home to take BJP leaders meeting news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या