21 November 2024 8:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ब्लॅकमेल-खंडणी | धनंजय मुंडेंच्या मेहुण्याकडूनही रेणूसह तिच्या भावाविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये तक्रार

Dhananjay Munde, Purushottam Kendre, Renu Sharma

मुंबई, २५ जानेवारी: भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मनसेचे मनीष धुरी यांनी देखील सत्य समोर आणल्याने रेणू शर्माच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यानंतर अजून एक प्रकार समोर आला आहे.

रेणूसह तिचा भाऊ आणि बहिणीविरोधात ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला तक्रार दाखल केली असल्याची माहिती आता उजेडात येत आहेत.

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरणाला कालपासून नवनवे खुलासे होत असून वेगळ्या वळणावर हे प्रकरण आले आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, तिची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या वेळी अनेकदा त्रास देण्याचा प्रकार घडला. नजीकच्या काळात हे प्रकार वाढतच गेले. रुग्णालयातही त्यांनी त्रास दिला. त्रास सहन होईना म्हणून मी शेवटी तक्रार केली. २०१९ मध्ये धनंजय मुंडे आमदार झाल्यापासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते असल्याची माहिती केंद्रे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

 

News English Summary: BJP leader Krishna Hegde has leveled serious allegations against Renu Sharma. He has written a detailed letter to the Mumbai Police in this regard. In this letter, Krishna Hegde has sensationally accused Renu Sharma of trying to lure me into a relationship. Renu Sharma has been calling and texting me since 2010. She was constantly pushing me for a relationship.

News English Title: Dhananjay Munde relative Purushottam Kendre was filed complaint against Renu Sharma in November 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x