15 November 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

धनगर समाजाचे नेते लहू शेवाळें यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Dhangar Samaj, leader Lahu Shewale, joins congress

मुंबई, १७ नोव्हेंबर: धनगर समाजाचे नेते आणि जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे (Dhangar Samaj leader and Jai Malhar Sena commander Lahu Shewale) यांनी आज (१७ नोव्हेंबर) शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील दलितांना न्याय देण्याचा पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. लहू शेवाळे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (State Revenue minister Balasaheb Thorat) म्हणाले.

एच. के. पाटील यावेळी (Congress leader H K Patil) बोलताना म्हणाले की, धनगर समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभा राहिलेला आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकात देखील हा समाज मोठ्या संख्येने आहे. काँग्रेस पक्षही हा समाजाच्या पाठीशी नेहमीच उभा राहिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात सिद्धरामय्या यांना ५ वर्ष मुख्यमंत्रीही करुन दाखवले. दोन्ही राज्यात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. लहू शेवाळे यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला आणखी बळ मिळेल. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत असून पक्ष संघटना अधिक बळकट होत आहे, असे पाटील म्हणाले.

टिळक भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, आशिष दुआ, मा. आ. मोहन जोशी, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लहू शेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

 

News English Summary: Dhangar Samaj leader and Jai Malhar Sena commander Lahu Shewale today (November 17) joined the Congress party along with hundreds of office bearers and activists. The National Congress Party is the party that takes all the society along and is on the path of equality enshrined in the Constitution. The party has always tried to give justice to the Dalits in the society. Lahu Shewale’s entry into the party will further strengthen the Congress party, said Maharashtra Pradesh Congress Committee Chairman and Revenue Minister Balasaheb Thorat.

News English Title: Dhangar Samaj leader Lahu Shewale joins congress party with hundreds of activists News updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x