24 December 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर

DIG Sanjay Pandey

मुंबई, १७ मे | महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक संजय पांडे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय पांडे परवानगी न घेताच चंदिगढला सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे. याआधीही संजय पांडे आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळ असताना पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे? असा सवाल विचारला जात आहे. संजय पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज आहे. संजय पांडे यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने केल्याची माहिती आहे.

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

 

News English Summary: Director General of Police Sanjay Pandey is on a holiday outside the state during the cyclone Tautke in Maharashtra. It is learned that Sanjay Pandey went on holiday to Chandigarh without permission. Shivsena is angry over Sanjay Pandey’s behavior and is demanding action.

News English Title: DIG Sanjay Pandey is on holiday during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x