24 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

अजब | केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी या मागणीवरूनही राष्ट्रपती राजवटीची मागणी

Tauktae cyclone

मुंबई, २२ मे | तौते चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

 

News English Summary: CM Uddhav Thackeray has demanded that the Center should provide financial assistance to the state as the cyclone also hit Maharashtra. BJP MLA Nitesh Rane has criticized it. Uddhavji should not sing the same cry of help to the Center. Instead, dismiss the state government and impose presidential rule.

News English Title: Dismiss the state government and impose presidential rule in Maharashtra said MLA Nilesh Rane news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x