5 November 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

ठाणे मनपाकडून गृहसंकुलांतील विक्री झालेल्या घरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लोकांमध्ये संताप

Thane Municipal Corporation, Corona Crisis, Covid Care Center

ठाणे, १ जून: जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले. एकीकडे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा पार केला असताना दुसरीकडे ठामपातील रुग्णांनीही तीन हजारांचा तर कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण रुग्णसंख्येने एक हजारांचा आणि मिरा भायंदरने सातशेचा टप्पा पार केला आहे.

नव्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२ वर पोहोचली आहे. ठामपा हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८९ झाला आहे. त्याचबरोबर १0६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ठाणे शहर, दिवा-मानपाडा रस्त्यांवरील नव्याने उभारण्यात आलेल्या गृहसंकुलांमध्ये विक्री झालेल्या आणि तयार ताबा अशा स्थितीत असलेल्या घरांमध्ये कोरोना रुग्णांचे निवारा केंद्र सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. घोडबंदर, दिवा यासारख्या भागात मोठ्या विकासकांच्या गृहनिर्माण वसातींमधील तीन हजारांहून अधिक घरे कोरोना रुग्णांचं अलगीकरण, विलगीकरण त्यांच्यावर उपचार यासाठी अधिग्रहित केली जात आहेत. यासाठी मूळ मालकाची कोणतीही संमती घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होतो आहे.

अगदी अशीच घटना आज दिवा-मानपाडा रोडवर असलेल्या माय रुणवाल सिटीमध्ये घडली. या ठिकाणी जेव्हा महापालिकेचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्यात आणि नागरिकांमध्ये वाद झाला. संमती नसताना तुम्ही विलगीकरणासाठी घरं ताब्यात कशी काय घेऊ शकता असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी जेव्हा इमारतीत शिरु लागले तेव्हा नागिरकांमध्ये आणि त्यांच्यात वाद झाला. कर्मचाऱ्यांनी आमच्यासोबत अरेरावी केली असा आरोप आता येथील नागरिकांनी केला आहे.

 

News English Summary: It happened in My Runwal City on Diva-Manpada Road. When the municipal officials came to this place, there was a dispute between them and the citizens. Citizens have raised the question of how you can take possession of houses for separation without consent.

News English Title: Dispute Between Mahapalika Staff And Citizens Over Corona Center At Runwal My City News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x