15 November 2024 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त

Dr Sanjay Kute

मुंबई, १० ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत. आश्चर्य म्हणजे प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित शहा यांचे खास आशिष शेलार इच्छुक होते. मात्र शेलार हे फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये नाहीत.

कुटे यांनी देखील इतरांसारखं उत्तर दिलं:
काही दिवसांपासून आमदार डॉ. संजय कुटे हे दिल्लीत आहेत. मात्र प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्याने त्यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली नसून पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत.’

आ. संजय कुटे अचानक प्रकाशझोतात?
दिल्लीतील बैठक ही भाजपच्या खासदारांची होती आणि त्यात राज्यातील केवळ वरिष्ठ पद तथा माजी मंत्री राहिलेल्या आमदारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र फडणवीस समर्थक आ. संजय कुटे अचानक प्रकाशझोतात या गर्दीत वावरू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात संजय कुटे यांना त्या मंत्रिमंडळात घेतले होते. मात्र त्यांना विशेष काम करण्याची संधी मिळाली नव्हती.

पंकजांना निमंत्रण हा देखील रणनीतीचा भाग?
दिल्लीतील बैठकीला ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. परिणामी उद्या पंकजा मुंडे यांनी OBC गळचेपीवरून बाहेर आक्षेप घेतल्यास त्या स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांची या नियुक्तीला संमती होती असं सांगून पंकजांना राजकीय कोंडीत पकडलं जाईल.

शक्यता का?
1. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर कुटे यांचे नाव फडणवीस यांनी पुढे केल्याचे समजते.
2. राज्यातील सध्याची परिस्थिती हाताळायची असेल तर पुन्हा एकवार ओबीसी नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व मराठा नेते चंद्रकांत पाटील यांना पायउतार केले जाण्याची दाट शक्यता आहे.
3. ओबीसी नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडेंनी फडणवीस यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे नवे ओबीसी नेतृत्व पुढे आणणे फडणवीस आणि पक्षासाठी अगत्याचे झाले आहे.
4. कुटे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात संजय कुटे यांना त्या मंत्रिमंडळात घेतले होते. मात्र त्यांना विशेष काम करण्याची संधी मिळाली नव्हती.
५. भविष्यात पंकजा मुंडे यांनी बंड केल्यास आम्ही OBC नेत्यांना संधी दिली अशी बॉम्ब फडणवीस समर्थक सुरु करतील आणि पंकज मुंडेंचं राजकीय बंड निकामी करता येईल तसेच त्या भाजपमध्ये राहिल्या तरी बिकट अवस्था होईल अशी खेळी खेळली जाऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Dr Sanjay Kute may appoint as BJP state president selection of OBS leader news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x