22 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा
x

२-४ आठवड्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही | डॉ. संजय ओक यांचा इशारा

Dr Sanjay Oak

मुंबई, १७ जून | महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनानं स्वत:चं स्वरुप बदललं आणि दुसरी लाट देशात आली असं राज्याचे टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले. डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत चाळीशीतली माणसं इतकी गमावली नव्हती. एका वाक्यात जर पहिला आणि दुसरा लाटेचा फरक मला कोणी विचारला, तर पहिला लाटेमध्ये जर समजा सहा जणांचे कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती संक्रमित व्हायची पण दुसऱ्या लाटेत कुटुंबातील सहाच्या सहा बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण तिसऱ्या लाटेचा विचार करतो, आता ती कधी येईल त्याची व्याप्ती केवढी मोठी असेल खरंच लहान मुलं जास्त होतील का आणि त्यासाठी आपण कोणती तयारी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे.

तसेच लसीकरणाचा कार्यक्रम जितक्या वेगाने पुढे जायला हवा होता तेवढा पुढे गेला नाही. त्यामागे काही कारण असतील पण हे सत्य आहे. लोकं एकत्र येण्याची प्रवृत्ती, सोशल डिस्टेंसिंग पाळत नाही. आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहोत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरी लाट येईल अशी शक्यता होती. परंतु हे पाहता तिसरी लाट अपेक्षेपेक्षा अधिकच येण्याची भीती वाटते. २-४ आठवड्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा डॉ. संजय ओक यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे.

आयुष 64चा वापर:
गाईडलाईननुसार लहान मुलांचं त्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यात 10 ते 15, 5 ते 10 आणि 5 वर्षापासून त्या खालील मुलांचे गट निर्माण केले आहेत. मुलांना या वयोगटानुसारच औषध देण्यास सांगण्यात आलं आहे. ताप आला तर आयुष 64 हे औषध देण्याचं गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आल्याचं राजगोपाल यांनी सांगितलं.

आयुर्वेद बिहेविअर प्रोटोकॉल:
मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनीही बिहेविअर प्रोटोकॉलचा वापर सुरू करावा, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार आई-वडिलांना आयुर्वेदिक औषधांचा खास वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच कोमट पाण्याने गुळण्या करण्याचा सल्लाही लहान मुलांना देण्यात आला आहे, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं.

लहान मुलांकडे लक्ष द्या:
आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमध्ये लहान मुलांच्या हालचालींकडेही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केवळ तापच नव्हे तर मुलांची अॅक्टिव्हिटी कमी झाली तरी तात्काळ डॉक्टरांना दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मोहरीच्या तेलाचा वापर:
गाईडलाईनमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करणे बंधनकारक केलं आहे. मोहरीचं तेल कोरोना संरक्षण कवच म्हणून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. या तेलामुळे नाकातून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचंही बोललं जात आहे. लहान मुलांना या तेलाचा दररोज वापर करण्यास सांगण्यात आलं आहे.

मुलं एकटी राहू नयेत:
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांना साधारणपणे आयसोलेशनमध्ये पाठवलं जातं. अशावेळी लहान मुलांना आयसोलेट केलं तर त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने पालकांसाठी वेगळी गाईडलाईन जारी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Dr Sanjay Oak gave alert on Third Wave of corona virus Delta Plus news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x