5 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा | अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा

Draw an ordinance, Maratha reservation. MP Chhatrapati Udayanraje Bhonsale, Marathi News ABP Maza

पुणे, ११ सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही सरकारवर घणाघाती टीका करत इशारा दिला आहे. ‘मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,’ असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे,’ असा आरोपही उदयनराजेंनी राज्य सरकारवर केला आहे.

“मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला खिळ बसली आहे. सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. याआधी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे ते टिकवता आले. पण आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्काच बसला आहे. फक्त राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे.

महाराष्ट्र सरकार ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण चर्चा झाली नसताना इतका मोठा निर्णय होणं हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे अध्यादेश काढून सरकारने आरक्षण अबाधित ठेवावं हा एकच मार्ग त्यांच्यासमोर आहे.”

 

News English Summary: The BJP has taken an aggressive stance against the state government after the Supreme Court adjourned the Maratha reservation. BJP’s Rajya Sabha MP Udayan Raje Bhosale has also sharply criticized the government. ‘I make a public appeal to the government. The government should immediately remove the ordinance and keep the Maratha reservation intact.

News English Title: Draw an ordinance for Maratha reservation otherwise MP Chhatrapati Udayanraje Bhonsale warning to Maharashtra govt Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x