प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत जयंत पाटलांची सुद्धा उपस्थिती | लोकसभेत महाविकास आघाडी फॉर्म्युला?
मुंबई, ११ जून | पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि मोदी विरोधी वातावरण झाल्याचे संकेत मिळताच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने या बैठकीत मोठा निर्णय होण्याचे कयास लढवले जात आहेत.
प्रशांत किशोर यांनी आज अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेटायला आले. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, गेल्या दीड तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू अस्लयाने ही सदिच्छा भेट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.
जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पालिका निवडणुका या पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय स्ट्रॅटेजी असावी याची पाटील यांनाही माहिती असावी यासाठी पाटील यांना तातडीने सिल्व्हर ओकवर बोलावून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
News Summary: Discussions between Prashant Kishor and NCP’s Sharad Pawar have been going on for the last one and a half hours. According to reliable sources, discussions are underway to implement the Bengal model in the country and Maharashtra as well as in the state. While this discussion is going on, NCP’s state president Jayant Patil has also joined Silver Oak and they are fighting for a big decision in this meeting.
News Title: During Prashant Kishor and Sharad Pawar meet minister Jayant Patil was present news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती