24 November 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

मुंब्रा भागातील प्राईम क्रिटिकेयर या खाजगी हॉस्पिटलला आग | 4 रुग्णांचा मृत्यू

Prime Criticare Hospital

ठाणे, २८ एप्रिल | मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पहाटे 3 वाजता भीषण आग लागली. या घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 20 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर आयसीयूतील 6 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ठाणे महानगरपालिकेने चौकशीचे आदेश दिले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

News English Summary: Today at around 03:40 am fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane. Two fire engines & one rescue vehicle are at the spot. Fire extinguishing underway. Four dead during shifting of patients to another hospital said Thane Municipal Corporation news updates.

News English Title: Early morning fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra news updates.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x