3 December 2024 10:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

BHR घोटाळ्याची चौकशी वेगाने पुढे सरकली अन खडसेंच्या कुटुंबावर सापळा पडला? | नाथाभाऊ CD लावणार?

Eknath Khadse

जळगाव, ०७ जुलै | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

अखेर काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशप्रसंगी ‘तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असा खोचक टोला खडसेंनी लगावला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्याची बातमी येऊन धडकली. एकंदरीत खडसेंच्या कुटुंबाभोवती ईडी चौकशी लागली असून आता सीडी लावण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.

भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी, जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी आरोप करण्यात आले होते. भूखंड खरेदी प्रकरणात दबावतंत्र वापरल्याचा आरोपही एकनाथराव खडसे यांच्यावर झाला होता. आरोपानंतर पक्षाने खडसेंना विचारणा केली आणि त्यानंतर खडसे यांनी राजीनामा दिला. इतक्या वर्षांची पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांचा हात असल्यावर आपण चौकशीतून सहज बाहेर पडू असा विश्वास खडसेंना होता परंतु सारं काही उलटच घडले. चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. झोटींग समितीने आपला अहवाल सादर केला.

अहवाल जाहीरपणे मांडण्यात आला नसला तरी खडसेंना त्यात क्लीनचिट मिळाल्याचे सांगण्यात आले. मुळात सर्व प्रकरण शांत झाले असे वाटत असले तरी खडसेंना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. गेल्या विधानसभेचा कार्यकाळ असाच लोटल्यानंतर पक्षनिष्ठा म्हणून खडसे भाजपासोबत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी खडसे यांचा पत्ता कट करत मुलगी रोहिणी खडसेला पक्षाकडून संधी देण्यात आली. निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. राज्यात पक्षाच्या हातून सत्ता गेली तरी खडसे पक्षातच राहिले.

पक्ष आपली कोणतीही दखल घेत असून पक्षात वारंवार दुय्यम वागणूक मिळत असल्याचे लक्षात आल्यावर एकनाथराव खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व जयंत पाटील यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. खडसेंनी भाजप सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केली होती. पक्ष सोडल्यानंतर होणाऱ्या नुकसानीचा आणि अडचणींचा ही त्यांनी आढावा घेतला.

भाजप सोडल्यावर ईडीच्या चौकशीचा त्रास होणार याची कल्पना त्यांना अगोदरच होती. राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी आपल्या भाषणात याबाबत बोलूनही दाखवले होते. तुम्ही लावली तर मी सीडी लावेल अशी धमकी वजा सूचना खडसेंनी दिली होती. गेले काही महिने सर्व सुरळीत राहिले पण मंगळवारी रात्री खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना मुंबईत ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात चौकशी असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव जिल्ह्यासह राज्यात गेल्या निवडणुकीपासून एका सीडीचा मुद्दा गाजत आहे. राज्यातील एका बड्या नेत्याच्या संदर्भात असलेली सीडी वेळ आल्यावर बाहेर काढून असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या गटाकडून करण्यात आले होते. आजपर्यंत या सीडीच्या केवळ चर्चाच असल्या तरी प्रत्यक्षात सीडी मात्र बाहेर आली नाही. शहरासह राज्यभरात काही दिवसांपूर्वीच बीएचआर पतसंस्था घोटाळा, जामनेर येथील व्यापारी संकुल प्रकरण, जळगाव शहरातील बाजार समिती व्यापारी संकुल यासह इतर काही प्रकरणे खडसे गटाकडून बाहेर काढण्यात आली होती.

सर्व प्रकरणांचा तपास सुरू असताना त्यात कुठे ना कुठे धागेदोरे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांनीपर्यंत जाऊन पोहोचत होते. खडसे गटाचे सर्व पत्ते सरळ पडत असल्याचे वाटत असताना केंद्राचे ब्रह्मास्त्र खडसे कुटुंबावर आले. शारदा खडसे यांचे पती गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतले. एकनाथराव खडसे यांना अगोदर आपल्या जावयाला चौकशीतून बाहेर काढायचे आहे, पत्नीला चौकाशीपासून वाचवायचे आहे आणि त्यानंतर सीडीचा मुद्दा बाहेर काढायला त्यांना संधी आहे. ईडीची चौकशी लागली असून सीडी केव्हा लागणार असे मेसेज सोशल मीडियात पसरत असून नागरिकांना देखील सीडीची उत्सुकता लागून आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED action against Eknath Khadse’s family members over Pune Bhosari Land case news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x