15 November 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

राजू शेट्टींनी ४३ कारखान्यांसंदर्भात ईडी'कडे फेऱ्या मारलेल्या | ED'ने केवळ जरंडेश्वर साखर कारखाना निवडला?

ED Jarandeshwar Sugar factory

मुंबई, ०२ जुलै | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेला हा कारखाना २०१० मध्ये जेव्हा खरेदी करण्यात आला होता तेव्हा त्याचे मूल्य ६५.७५ कोटी रुपये इतके हाेते. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना व मशिनरी जप्त करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. २०१९ मध्ये नोंद एफआयआरच्या आधारावर हा पीएमएलएचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात म्हटले होते की, हा साखर कारखाना तेव्हाचे अधिकारी व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी अत्यंत कमी किमतीत आपल्याच नातेवाइक व इतरांना विकला. या व्यवहारात एसएआरएफएईएसआय कायद्यांच्या नियमांना डावलण्यात आले हाेते. या कायद्यान्वये बँकांना कर्ज वसुलीसाठी अचल संपत्ती विकण्याची मुभा होती.

प्रकरण अजित व सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचा ईडीचा खुलासा; डमी कंपनीने केला कारखाना खरेदी:
ईडीनुसार, सध्या या कारखान्याची मालकी गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे (कथितरीत्या डमी कंपनी) होती. तो जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.ला लीजवर दिला. स्पार्कलिंग सॉइल प्रा.लि. कंपनीकडे जरंडेश्वर कारखान्याचे सर्वाधिक शेअर्स आहेत. ही कंपनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या कंपनीशी संबंधित असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे ईडीने पत्रकात म्हटले आहे.

कारखान्याच्या नावाने बँकांकडून ७०० काेटी रुपयांची कर्जे उचलली:
* कारखाना खरेदीसाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.कडून भरभक्कम निधी मिळाला होता. जो अजित व सुनेत्रा पवारांच्या स्पार्कलिंग सॉइल प्रा.लि.ने पुरवला होता. यामुळे अजित पवारांचे या प्रकरणात लागेबांधे असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
* जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.ने या कारखान्याच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांकडून २०१० ते आतापर्यंत तब्बल ७०० कोटी रुपयांची कर्जे घेतली. यामुळे गुन्ह्यातील कमाईवर ही जप्तीची कारवाई केल्याचे ईडीने म्हटले आहे.

नंतर नाममात्र किमतीत विकला:
ईडीने म्हटले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २०१० मधील लिलावात कारखान्याची किंमत कमी दाखवत व नियमांचे पालन न करता तो विकून टाकला. तत्कालीन बँकेच्या संचालक मंंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि.ने विकत घेऊन तो तत्काळ जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.ला लीजवर दिला, असा दावा ईडीने केला आहे.

राजू शेट्टी यांनाही शंका:
मी अनेक दिवसांपासून सांगतोय, की सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातोय. एक नाही ४३ कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी. या कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चुकीची आहे. कारण हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय. ईडीकडे ५ वर्षे फेऱ्या मारल्या. ४३ कारखान्यांची यादी हवी तर पुन्हा देतो. ईडी ही राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. पाच वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. आता ही कारवाई करण्याचा अर्थ ईडीला कोणीतरी सांगतोय, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतोय, म्हणून त्याचा काटा काढायचाय, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

सहकारी होते तेव्हा हे कारखाने तोट्यात होते, खासगी झाल्यावर ते फाय़द्याच चालू लागले आहे. याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी साखर कारखाने विकत घेतले आहेत. सर्व कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED action against Jarandeshwar Sugar factory related with DCM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x