18 January 2025 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

मूळ कस्टम अधिकारी असणारे राणा बॅनर्जी राज ठाकरेंच्या चौकशीसाठी प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये?

Facebook, Rana Banerjee, Ed Officer Rana Banerjee

मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे काल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले होते. दरम्यान, कालच्या चौकशीत नक्की किती वेळ लागणार हे निश्चित सांगता येत नव्हतं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं होतं. एकदिवस आधीपासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.

दरम्यान, २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान, आज सकाळी संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मात्र दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं म्हणून राणा बॅनर्जी (असिस्टंट डिरेक्टर ईडी) या ईडीच्या अधिकाऱ्याने समन्स बजावलं आणि त्यांच्या स्वाक्षरीची तारीख १६ ऑगस्ट २०१९ अशी असल्याचं समजतं. मात्र आमच्या टीमने अधिक ऑनलाईन चौकशी केली असता असिस्टंट डिरेक्टर ईडी राणा बॅनर्जी हे फेसबुकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फॉलो करत असल्याचं समोर आलं असून त्यांनी अमित शहांच्या पेजला लाईक सुद्धा केलं आहे. विशेष म्हणजे ते राजकीय व्यक्तींमध्ये केवळ अमित शहांनी फॉलो करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

मूळ कस्टम खात्यामध्ये कार्यरत असणारे राणा हे प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करत आहेत. कोहिनूर मिल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते खास दिल्लीवर मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. ‘ईडी’ने १६ ऑगस्ट रोजी जारी राज ठाकरेंच्या नावे जारी केलेल्या नोटीसची बातमी सोमवारी वाऱ्यासारखी पसरली. प्रसारमाध्यमांपासून सोशल नेटवर्किंगवर राज यांना ‘ईडी’ने चौकशीची नोटीस पाठवल्याची चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राज यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला. या नोटीसमध्ये राज यांना चौकशीला बोलणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव राणा बॅनर्जी असल्याचे दिसत होते. त्यांच्या सहीनेच ही नोटीस राज यांना आली होती.

राज यांना पाठवलेल्या नोटिसीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आम्ही फेसबुक आणि ट्विटवर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवणारा हा अधिकारी आहे तरी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फेसबुक अकाऊंट सापडले. त्यानंतर आमच्या टीमने संध्याकाळी संपूर्ण बातमी लिंक आणि स्क्रिनशॉट सहित प्रसिद्ध केली. मात्र त्यानंतर आमच्या फेसबुक पेजवरून सदर बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर अनेक माध्यमांनी त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तासाभरातच संबंधित अधिकाऱ्याने त्याचे फेसबुक अकाउंट डिलीट मारल्याचे समोर आले.

या फेसबुक प्रोफाइलवर राणा हे ‘ईडी’मध्ये काम करत असल्याचे दिसत होते. तसेच त्यांच्या फ्रेण्डलीस्टमधील अनेकजण ईडीमध्ये काम करत असल्याचे दिसत होते. अनेकांनी राणा यांनी लाईक केलेल्या पेसेजचा स्क्रीनशॉर्टही व्हायरल केला. यामध्ये अमित शाह या एकमेव राजकारण्याचे पेज राणा यांनी लाईक केल्याचे स्क्रीनशॉर्टसहीत ट्विटवर व्हायरल झाल्याचे दिसले. अनेक राज समर्थकांनी यावरुन राणा यांचा थेट भाजपशी संबंध असल्याची टीका करत ट्विटवर यासंदर्भात पोस्ट केले. काही वृत्तवाहिन्यांनी या व्हायरल स्क्रीनशॉर्टबद्दल बातमी दिल्यानंतर फेसबुकवर राणा यांचे अकाऊंट दिसणे बंद झाले. मात्र अधिकाऱ्याने प्रोफाइल डिलीट मारल्याने समाज माध्यमांवर त्या कनेक्शनची चर्चा होऊ लागली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x