दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन | अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिली माहिती
मुंबई, २८ मे | मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मुल्यमापन:
यामध्ये, इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यामापन योजोना शासन निर्णय दि.८ ऑगस्ट २०२० नुसार मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे गृहपाठ/ तोडीं परीक्षा/ प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
- विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण
- या प्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूनक यासाठी ५० टक्के भारांश)
सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य:
इयत्ता १० वीचा निकाल मूल्यमापनानं लागल्यानंतरही ११ वीच्या परीक्षेसाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
जूनच्या अखेरपर्यंत निकाल लागणार:
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल जूनच्या अखेरपर्यंत लावण्याचं लक्ष्य शिक्षण बोर्डाचं असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. याशिवाय जे विद्यार्थी शाळेनं केलेल्या मूल्यमापनावर खूश नसतील त्यांना पुढील काळात दोन तासांच्या परीक्षेचं आयोजन करण्याबाबतही शिक्षण विभाग विचार करत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे.
News English Summary: For the last several days, there was confusion over the results of the 10th and 12th exams. There was confusion among parents and students. All this information has been given by the school education minister Varsha Gaikwad. He has given detailed information about this while holding a press conference today (May 28). Education Minister Varsha Gaikwad has informed that the students of class X will be assessed 100 marks in each subject.
News English Title: Education Minister Varsha Gaikwad has informed that the students of class X will be assessed 100 marks in each subject news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो