22 January 2025 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश | खासदार सुनेची भाजपच्या बैठकीलाच दांडी

Eknath Khadse, MP Raksha Khadse, BJP Core committee meeting

जळगाव, २७ ऑक्टोबर: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) जळगावात पोहचले आणि त्यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं होतं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर रक्षा खडसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, रक्षा खडसे म्हणाल्या होत्या की, मी भाजपा सोडून जाणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहे. एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजपाला रामराम ठोकला आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्यामुळे मी भाजपामध्येच राहीन असं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लगेचच जळगाव भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते.

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली.

 

News English Summary: A meeting of the BJP’s core committee was held in Jalgaon soon after Eknath Khadse left the party. The meeting was convened by former minister Girish Mahajan. But the Eknath Khadse’s daughter-in-law and BJP MP Raksha Khadse was absent for the meeting.

News English Title: Eknath Khadse joins NCP MP Raksha Khadse absent for BJP Core committee meeting News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x