10 January 2025 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Patel Engineering Share Price | 48 रुपयांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, 55% परतावा मिळेल - NSE: PATELENG EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा
x

भाजपचं वरिष्ठ नेत्याविरुद्ध राजकारण | आता खडसे भाजपाला राजकीय धक्के देण्यास सज्ज

Eknath Khadse, NCP Party joining, Sharad Pawar

मुंबई, १३ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.

परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते. एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. तर, आज जामनेर येथील कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खडसे जाणार का नाही, याचीही चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसेंनी सस्पेन्स कायम ठेवला. फडणवीस यांच्या सोबत उपस्थित राहायचे की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल, असे खडसेंनी म्हटले होते. त्यामुळे, आजच्या कार्यक्रमाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊंचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच, याबाबत अधिकृत घोषणा होईल.

 

News English Summary: For the past few days, there has been talk that senior BJP leader Eknath Khadse will join the NCP. But now Eknath Khadse’s entry into the NCP is considered certain. It is learned that an official announcement about Khadse’s entry into the party will be made by the NCP soon. Senior BJP leader Eknath Khadse has been angry with the party for the last several days. Khadse was deeply hurt by not being selected in the recent National Executive. Therefore, there was talk that Eknath Khadse was on the path of NCP.

News English Title: Eknath Khadse NCP Party joining confirmed announcement soon by NCP Mumbai Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x