3 January 2025 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार - NSE: IRFC Rental Agreement | जागो घरमालक जागो, तुमची एका चुकीने भाडेकरू बनेल मालक, रेंटल प्रॉपर्टीविषयी ही गोष्ट लक्षात ठेवा Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK HDFC Mutual Fund | श्रीमंत व्हा, 2000 रुपये SIP वर 4.13 कोटी मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 1.88 कोटी मिळतील Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी, GMP सह प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch
x

विनयभंगाचा खटला दाखल करणं | इतक्या खालच्या स्तराचं राजकारण त्यांनी केलं

Eknath Khadse, Devendra Fadnavis

मुंबई, २१ ऑक्टोबर: गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.

“कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे,” असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.

 

News English Summary: The talk of Eknath Khadse’s NCP entry, which has been going on for the last several months, has come to an end. BJP leader Eknath Khadse has resigned from the party’s primary membership and will join the NCP on the 23rd. While leaving the party, Eknath Khadse is not angry with the central leadership and has made serious allegations that Devendra Fadnavis ruined his life.

News English Title: Eknath Khadse target Devendra Fadnavis after resigning BJP Party News Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x