24 November 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही | या निर्णयाचा देखील पश्चात्ताप होईल

Eknath Khadse, BJP leader Ram Shinde

मुंबई, २१ ऑक्टोबर: गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याची बातमी समजताच भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी बोलताना सांगितलं की, ‘एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात असताना त्यांना जी किंमत मिळाली ती त्यांना राष्ट्रवादीत मिळणारं नाही. तसेच त्यांच्याबरोबर जे जात आहे अशी जी वल्गना केली जात आहे ती चुकीची असून मला वाटतं नाही की भाजपचा कोणताही माणूस राष्ट्रवादीत जातील. कारणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा विस्तार होतं आहे.’ असं राम शिंदे म्हणाले.

‘एकनाथ खडसे यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा देखील येत्या त्यांना नक्की पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.’ अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.

 

News English Summary: Former BJP minister Ram Shinde has reacted to the news of Eknath Khadse’s resignation. He said, “Eknath Khadse will not get the price he got when he was in the Bharatiya Janata Party. Also, the allegation that is going on with them is wrong and I don’t think any BJP man will join the NCP.

News English Title: Eknath Khadse will not get a value in NCP party said BJP leader Ram Shinde News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x