22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

गौप्यस्फोट! गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्यावं म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांना भेटले होते

Eknath Shinde

CM Eknath Shinde | ‘काँग्रेस-राष्ट्रवादीवर शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते. 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती’ असा गौप्यस्फोट शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रस्ताव दिला होता आणि तो प्रस्ताव विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे घेवून आले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच केला. या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे.

चव्हाण यांनी या गौप्यस्फोटातुन शिंदे यांची कोंडी केली आहे. दरम्यान त्यांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधूनही दुजोरा देण्यात आला आहे. शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांची भेट घेतली होती आणि गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा सुरू केली होती, असा दावाही सामनामधील आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

‘ईडी’च्या भीतीने शिंदे भाजपमध्ये :
‘ईडी’च्या भीतीने शिंदे हे भाजपमध्ये गेले. कारण ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, नगरविकास खाते या माध्यमांतून पैसाच पैसा. त्या पैशातून सत्ता. सत्तेतून पुन्हा पैसा, या दुष्टचक्रात ते पूर्ण अडकले. नाही तर शिंदे आदमी काम का था असे उघड बोलले जाते. मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणे वेगळे व लालसा असणे वेगळे. शिंदे हे लालसेचे बळी ठरले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde was meet congress leader Ahemad Patel for political deal check details 02 October 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x