23 February 2025 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही | ही तर टाइमपास टोळी - आदित्य ठाकरे

Environment minister Aaditya Thackeray, MNS party, Raj Thackeray

मुंबई, ०४ फेब्रुवारी: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. “ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तत्पूर्वी वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं.

 

News English Summary: Environment Minister Aaditya Thackeray has ridiculed Maharashtra Navnirman Sena i.e. Maharashtra Navnirman Sena. Aaditya Thackeray has mentioned MNS as a timepass gang. MNS general secretary Sandeep Deshpande had mentioned Shiv Sena’s Veerappan gang. Now, the Shiv Sena’s mention of Maharashtra Navnirman Sena as a timepass gang has sparked a Sena-MNS dispute. Environment Minister Aaditya Thackeray inspected the Miyawaki Garden in the Bhakti Park area of ​​Chembur. He then answered various questions while talking to the media.

News English Title: Environment minister Aaditya Thackeray criticised MNS party news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x