23 December 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कोळसा खाण: केंद्राच्या 'त्या' निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा विरोध

Environment Minister Aditya Thackeray, coal mines, Tadoba and Andhari tiger reserves

मुंबई, २२ जून : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या ‘बंदर कोल ब्लॉक’ ला कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीतून वगळण्यात यावे.या मागणीसाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन करण्यात आली. कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीत, बंदर कोल ब्लॉकचा समावेश असल्याने ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्याघ्र संवर्धनाकरिता, ताडोबाच्या सुरक्षेकरता, व्याघ्र भ्रमण मार्गाच्या सुरक्षेकरता, जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष वृद्धी टाळण्याकरता प्रस्तावित बंद कोल ब्लॉक लिलावा यादीतून वगळण्याची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, याविरोधात इको-प्रो संस्थेने निदर्शने करीत सदर ‘बंदर कोल ब्लॉक‘ कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने करताना मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. रामाला तलाव परिसरात बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात इको-प्रोचे नितीन रामटेके यांच्या नैत्रुत्वात ही निदर्शनं करण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्रातील ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देशाच्या विविध भागांमध्ये कोळसा खाणींच्या लिलावाला परवानगी देण्यात आली होती. यामध्ये ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पानजीक असणाऱ्या खाणींचाही समावेश आहे. मात्र, आम्ही राज्यातील वन्यजीवनाचे नुकसान सहन करु शकत नाही. मी यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.

यापूर्वी १९९९ आणि २०११ मध्ये झालेल्या पाहणीनंतर या भागातील खाणींच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली होती. याठिकाणी खाणी सुरु झाल्यास ताडोबा आणि अंधारी पट्ट्यातील वन्यजीवन उद्ध्वस्त होईल. मग आपण पुन्हा या सगळ्या निरर्थक प्रक्रियेवर वेळ खर्च का करत आहोत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

२०१० मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची दिल्ली येथे भेट घेत, इको प्रो शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले होते. दहा वर्षांपूर्वी मंत्री जयराम रमेश यांनी खाणकामाला परवानगी नाकारून या भागातील विध्वंस रोखला होता. त्यांनी या भागाचे सर्वेक्षण करून घेतले होते. तेव्हा या भागात खाणकाम करणे योग्य नाही, असा निष्कर्ष निघाला होता. त्यामुळे मी आता पुन्हा एकदा प्रकाश जावडेकर यांना ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसराचे रक्षण करण्याची विनंती करत असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

 

News English Summary: State Environment Minister Aditya Thackeray has opposed the Centre’s decision to start coal mines near the Tadoba and Andhari tiger reserves in Maharashtra. A few days back, the Union Ministry of Environment had allowed the auction of coal mines in different parts of the country.

News English Title: Environment Minister Aditya Thackeray has opposed the Centres decision to start coal mines near the Tadoba and Andhari tiger reserves in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x