24 January 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771
x

यू. पी. एस. मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

MNS, Raj Thackeray, Anil Shidore, EVM, Ballet paper, EVM Hacking, Election Commission of India

मुंबई : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मदान १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.

आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचं स्वागत केलं. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल ४ सप्टेंबरला संपला होता. विरोधी पक्षांनी EVM मशिन्स विरुद्ध आंदोलन छेडलं आहे. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेतलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या शंकांच निरसन करत मदान यांना कारभार करावा लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं चॅलेंज दिलं आहे आणि तेव्हा सहारिया हे राज्य निवडणूक आयुक्तपदी होते आणि आता यू. पी. एस. मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त झाल्याने ते यावर काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x