23 January 2025 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा Penny Stocks | श्रीमंत करणार हा 1 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 22% कमाई, यापूर्वी 857% परतावा दिला - BOM: 511012 Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA
x

शिवसेनेची नाटकं राज्यातील शेतकऱ्यांना समजली आहेत; ते फसणार नाहीत: राजू शेट्टी

Raju Shetty, Shivsena, Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Swabhimani Shetkari Sanghatana, Sadabhau Khot, Famers Issue in Maharashtra, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : मागील काही दिवसांपासून आणि विधानसभा तोंडावर येताच शिवसेना पक्ष पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाला आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच विषयाला अनुसरून स्वभिमानीचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

या विषयी बोलताना राजू शेट्टी यांनी ‘विमा कंपन्यांबाबत उद्धव ठाकरे यांना अचानक जाग आली असून विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याआधी शिवसेनेने सरकारने विमा कंपनीशी काय करार केला आहे हे तपासावे. तो करार कोणत्या पद्धतीने का झाला याचा जाब मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करावी अस शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना शेट्टी यांनी ‘एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटक करायची ही शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत. आता शेतकरी फसणार नाही अस विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यामुळे बुधवारी नेमकं कर घडणार आणि विरोधक शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांनी कसं लक्ष करणार ते पाहावं लागणार आहे. त्यात सरकार मध्ये असून देखील आंदोलन करण्याची वेळ शिवसेनेवर येत असल्याने ते किती कामचुकार आहेत याचाच पुरावा असल्याचं राजकीय विरोधकांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x