राज्यातील युवकांवर फडणवीसांचा अविश्वास..मग केंद्राच्या स्किल इंडीयातून काय साधलं? - जयंत पाटील
मुंबई, २७ मे: मुंबईत १० हजार वेगळे बेड्स उपलब्ध होतील. रुग्णांची संख्या वाढली तर तशी व्यवस्था सज्ज आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले. राज्यातील युवकांवर त्यांनी अविश्वास दाखवल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. मागच्या ५ वर्षात केंद्र सरकारने स्किल इंडीया अंतर्गत दिलेल्या गोष्टींवर फडणवीसांचा विश्वास नसल्याचे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतून देण्यात आलेल्या मदतीचा संदर्भ दिला. या योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर दिले. त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपये केंद्रानं खर्च केले, असं फडणवीस यांनी सांगितलं. या रकमेला सिलिंडरच्या संख्येनं भागलं, तर एका सिलिंडरची किंमत २ हजार २२६ रुपये होते. एका सिलिंडरची किंमत इतकी आहे का? मग केंद्राकडून दिलं जाणारं अनुदान कुठे गेलं?, असे सवाल पाटील यांनी विचारले.
केंद्राने आयएफएससी यंत्रणा गुजरातला नेण्याचा निर्णय २७ एप्रिल म्हणजे कोरोना संकटात घेतला. याचे समर्थन फडणवीस करतात. ७ लाखापेक्षा अधिक स्थलांतरित मजुर आपल्या गावी गेले. ८५ टक्के खर्च दिल्याचे पियुष गोयल म्हणाले. असे असते तर हे मजूर मोफत जायला हवे होते असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
News English Summary: Fadnavis said that this skill is not present in the youth of Maharashtra. NCP leader Jayant Patil said that he had shown distrust in the youth of the state. He said Fadnavis did not believe in what the central government had given under Skill India in the last five years.
News English Title: Fadnavis said that those skills are not present in the youth of Maharashtra News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON