22 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार | घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार

Final year exams, online from home, Minister Uday Samant, UGC

मुंबई, ३१ ऑगस्ट : न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितीली आहे. तसेच, विद्यापीठांनी आपले म्हणने राज्य सरकारला कळविण्यापूर्वी विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उदय सामंत यांनी आज (31 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस संसर्ग, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारांनी असमर्थता दाखवली होती.

या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार आहोत. यासाठी कमी मार्कांची परीक्षा होईल. 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची युजीसीला विनंती करणार आहोत. यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची दोन -तीन दिवसात बैठक घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकेल. परीक्षेसाठी आपले आरोग्य, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकार दक्ष आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीने त्याबाबत अहवालही दिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा देता यावी यासाठी कुलगुरुंचही एकमत असल्याचे उदय सामंत म्हणाले.

 

News English Summary: The exam will be conducted online and we will make it possible to take the exam at home. For this, low marks will be tested. We will request the UGC to extend the deadline till October 31.

News English Title: Final year exams online from home month for study says minister Uday Samant News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UGC(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x