27 April 2025 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

अखेर संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

Forest Minister Sanjay Rathod, Resigned, Pooja Chavan

मुंबई, २८ फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारु नये, असं महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणात संजय राठोड दोषी आढळले तर आमदार पदाचा राजीनामा द्या, अशी विनंती आम्ही करु,’ अशी विनंती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

 

News English Summary: After increasing pressure in the Pooja Chavan death case, Forest Minister Sanjay Rathore has finally resigned. After meeting Chief Minister Uddhav Thackeray at his Varsha residence, Sanjay Rathore tendered his resignation as Cabinet Minister. Sanjay Rathore along with his wife Sheetal and brother-in-law Sachin Naik had gone to Varsha Bungalow from Chheda Sadan residence in Churchgate around 2.30 pm. After that, the political circles were paying attention to the developments at Varsha Bungalow.

News English Title: Forest Minister Sanjay Rathore has finally resigned news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony