22 January 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

चोरांच्या टोळीत बसलाय की काय...म्हणून बुट हातात घेऊन भाषण? - रुपाली चाकणकर

CM Devendra Fadnavis, NCP Rupali Chakankar

औरंगाबाद: पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.

‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही सत्तेत असतानाच हाती घेतलेल्या योजना पुढे घेऊन जा, त्याचे आम्ही समर्थन करू; पण त्यास खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नेत्या पकंजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरून लढाई करू,’असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

दरम्यान, विरोधकांनी मात्र या उपोषणावर टीका करताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष केलं आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडेंनी केलेल्या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. फडणवीस अगदी काही मिनिटंच व्यासपीठावर होते. यावेळी फडणवीसांनी बूट हातात धरल्याचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले.

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची बोचरी टीका

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होतात. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ढोल बडवत सांगत होतात. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या.’ अशी मागणी चाकणकरांनी केली आहे.

 

Web Title:  Former CM Devendra Fadnavis found holding shoes in hand at Pankaja Munde Aurangabad Hunger Agitation.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x