15 November 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO
x

कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’

Shivsena, Former CM Narayan Rane, Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नारायण राणे यांनी आत्मचरित्राविषयी बोलताना त्यातील काही ठळक बाबींवर भाष्य केले. राणे म्हणाले, हे पूस्तक लिहीताना मी खूप काळजी घेतली आहे. वादग्रस्त मुद्दे गाळले असल्याचे राणेंनी सांगीतलं. शिवसेनेत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्यावर खूप प्रेम होतं. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून सगळ्या जबाबदा-या पार पाडल्या. तेव्हाचजी शिवसेना आणि आत्ताची सेना यामध्ये जमीन आकाश एवढा फरक आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. मात्र आताचे शिवसैनिक कमर्शिअल झाले आहेत. ते ग्राऊंड लेवलवरचंम काम करू शकत नाही. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे, असे राणे म्हणाले.

शिवसेनेसोबत भाष्य करताना भावूक होत नारायण राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला घडविले, मार्गदर्शन केले. अंगात भिनवले. भाषण कसे करायचे ते शिकवले. त्या काळी वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे नेते सत्तेत होते. त्या काळात शिवसेना वाढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, तेव्हा जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते. बाळासाहेबांनी आम्हाला मनाचा मोठेपणा ठेवा अशी शिकवण दिली. मनाचा मोठेपणा दाखवला की माणूस मोठा होतो ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. ती मी जोपासली म्हणून लोकांसाठी काही करू शकलो. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले नाही तेवढे प्रेम बाळासाहेबांनी दिले.

त्याचप्रमाणे शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांना ६ पानी पत्र लिहिलं होतं. ते पत्र त्यांनी वाचल्यानंतर त्यांचा फोन आला आणि नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन असं विधान केले होते. असे राणेंनी यावेळी सांगीतले.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x