23 February 2025 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Ajit Pawar, Chandrakant Patil

पुणे: राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार सोमवार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एनसीपीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यामांशी बोलताना उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, मुळात त्यांच्या मनात एवढ्या वेदना होत आहेत की, त्यांचा २५ वर्षांपासूनचा मित्र पक्ष शिवसेना त्यांच्यापासून बाजूला गेल्यामुळे त्यांच्या आमदारांची संख्या १०५ असुनही त्यांना सरकार बनवत आलं नाही. हे दुःख त्यांच्या मनात खूप वेदना देऊन जात आहे. म्हणून सातत्याने अशाप्रकारची वक्तव्यं त्यांच्याकडून केली जात आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील त्यांचे दु:ख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील खोचक टीका केली. विजयसिंह मोहितेंवर बोलण्यास मात्र अजित यांनी नकार दिला.

कर्जमाफीचा श्रेय घेण्याचा कोणताही वाद महाविकास आघाडीत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. याबाबत मुंबईत बोलणे झाले असून तीनही पक्षांच्या प्रमुखांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विचारांच्या स्थानिक पक्षप्रमुखांकडून एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार असून तिथे एकमत नाही झालं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.

 

Web Title:  Former Deputy Minister and NCP Leader Ajit Pawar slams BJP State President Chandrakant Patil over Home Ministry Statement.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x