22 December 2024 6:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

माझ्यावरील आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून राजीनामा दिला - संजय राठोड

Sanjay Rathod

यवतमाळ, १३ जुलै | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, असेही ते म्हणाले. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

राज्य मागासवर्गीय व्हीजेएनटीचे सर्वेक्षण करावे:
ओबीसी आरक्षण रद्द आहे. हे आरक्षण पुन्हा देण्यात यावे यासाठी राज्याने मागासवर्गीय आयोगाने नेमला आहे. हा आयोग राज्यात सर्वेक्षणकरून त्याचा डाटा तयार करणार आहे. राज्य मागासवर्गीय व्हीजेएनटीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

माझ्यावर झालेले आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर टीका केली जात होते. त्यामुळे राजीनामा दिला. त्याची चौकशी समिती नेमण्यात येईल. त्यात मी निर्दोष असेल तर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, मी दोषी आढळून आलो तर मी स्वतः कायमचा बाजूला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार, अशी चर्चा होती. याबाबत ते म्हणाले, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबतीत पक्षाने घेतलेली भूमिका अन्याय करणारी असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. मात्र, त्या स्वतः अन्याय झाला नाही असे बोलत आहेत. यावर काय बोलावे? असे प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबतही त्यांनी बोलणे टाळले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former forest minister Sanjay Rathod clarification over allegation on him news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x