भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा | भाजप ते करत नसेल तर... - हर्षवर्धन जाधव यांची भूमिका
औरंगाबाद, २७ मे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले.
ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आणखी आक्रमक भूमिका घ्यावी, असे सुचविले. छत्रपती संभाजी राजेंनी भाजपच्या मदतीने संसदेत प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा कायदा करावा. जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी संभाजी राजे यांचे ऐकत नसतील, भेटत नसतील तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते. तत्पूर्वी त्यांनी पवारांची भेट घेतली होती.
News English Summary: If even Prime Minister Narendra Modi is not ready to meet to discuss the issue of Maratha reservation, then Sambhaji Raje Chhatrapati should resign from his MP post, said former Kannada MLA Harshvardhan Jadhav. Harshvardhan Jadhav also said that the issue of Maratha reservation will not be solved by visiting the state or agitating.
News English Title: Former Kannada MLA Harshvardhan Jadhav statement after Sambhajiraje meets over Maratha Reservation news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS