राजू शेट्टी म्हणजे शेतकऱ्यांनी गावात देवाच्या नावानं सोडलेला वळू - सदाभाऊ खोत
पुणे, १ ऑगस्ट : राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. यावेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे राजू शेट्टी भ्रमिष्ट झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं. राजू शेट्टी भंपक माणूस आहे. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली.
सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळालं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी शरसंधान साधलं. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.
News English Summary: Saying that Raju Shetty was confused, Sadabhau Khot made a conspiracy. Raju Shetty is a bad man at heart. Raju Shetty has now become Kaju Shetty. This bewildered man is deluded. In every village there is a bull in the name of God. That’s the way it is. He was abandoned by the farmers.
News English Title: Former minister Sadabhau Khot attacks Raju shetti calls him bull News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC