BHR घोटाळा | गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग | पैसे खाताना कचराही सोडला नाही
नाशिक, ३ डिसेंबर: भाईचंद हिरांचद रायसोनी (BHR Scam) सहकारी बँकेतील कथित 1100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी राजकीय गोटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ” भाजप नेते गिरीश महाजन (Former Minister Girish Mahajan) यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट संबंध आहे,” असा थेट आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Former MLA Anil Gote) यांनी केला. तसेच, पैसे खाताना त्यांनी कचराही सोडला नाही अशी टीकाही त्यांनी महाजनांवर केली. ते नाशिकमध्ये बोलत होते.
“गिरीश महाजन यांचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या एका कंपनीचा बीएचआर घोटाळ्यात थेट सहभाग (A company with direct links to Girish Mahajan is directly involved in the BHR scam) आहे. या कंपनीचे सुनील झवर, संचेती आणि बोरा असे तीन संचालक आहेत. हे तिन्ही संचालक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, यांनी पैसे खाताना कचरासुद्धा सोडला नाही,” असे अनिल गोटे (All three directors are close to Girish Mahajan, who did not even leave trash while eating money) म्हणाले. तसेच, शंभर टक्के पुराव्यांसहित बोलत असल्याचा दावादेखील त्यांनी केला. नाशिक, धुळे, जळगाव येथील महापालिका आयुक्त, महापौर स्थायी समितीचे सभापती हे देखील या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा गौप्यस्फोट अनिल गोटे यांनी केला.
दरम्यान, राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात एक महत्वाची आणि अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले (Pune Economic Crimes Branch arrests former Jamner Municipal Corporation mayor Paras Lalvani for questioning) होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता (Property in the name of activists so that Girish Mahajan does not appear to be a direct beneficiary of BHR credit union fraud) घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने ऑनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.
News English Summary: Bhai Chand Hiranchad Raisoni (BHR Scam) Allegations of misappropriation of Rs 1,100 crore in a co-operative bank are being leveled at each other in the political arena. “A company directly linked to BJP leader Girish Mahajan is directly involved in the BHR scam,” alleged former MLA Anil Gote. He also criticized Mahajan for not leaving trash while eating money. He was speaking in Nashik.
News English Title: Former MLA Anil Gote serious allegations on Girish Mahajan over BHR scam News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO