22 November 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

एकही मत ज्याच्या नावावर मिळाल्याची नोंद नाही ते मुख्यमंत्री झाले - निलेश राणे

Former MP Nilesh Rane, CM Uddhav Thackeray

मुंबई, १४ मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधि सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी याविषयावरून आधीच उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं होतं. मात्र ही निवड झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “फुकट CM किंवा CM फुकटात काही म्हणा… निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रात एकही मत ज्याच्या नावावर मिळाल्याची नोंद नाही तो माणूस मुख्यमंत्री झाला.”

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray will take oath of office on Monday, May 18 in the presence of the Speaker of the Legislative Council. As the Legislative Council election was held without any objection, the swearing in of the candidates will be held in the presence of the Speaker in the Legislative Council on Monday. However, Former MP and BJP Leader Nilesh Rane criticized CM Uddhav Thackeray over MLC issue.

News English Title: Former MP and BJP Leader Nilesh Rane criticized CM Uddhav Thackeray over MLC issue News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x