22 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

Breaking | उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न

Mumbai police, Parambir Singh, Mumbai high court, Anil Deshmukh

मुंबई, ३१ मार्च: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.

सुनावणी दरम्यान एफआयआर कुठे आहे? फौजदारी स्वरुपाच्या प्रकरणामध्ये तपास करायचा असल्यास प्रथम एफआयआर दाखल करणं आवश्यक आहे. या प्रकरणी एफआयआर कुठे आहे, अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींकडून परमबीर सिंहांच्या वकिलांना करण्यात आली. त्यावेळी पारदर्शक आणि योग्य तपास व्हायचा असेल तर राज्याबाहेर हलवण्यात यावा, कारण महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सीबीआयला परवानगीशिवाय तपास करता येत नाही, अशी मागणी परमबीर सिंह यांच्या वकिलांनी केली.

तसेच सुनावणीत दरम्यान राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणारे अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी परमबीर सिंह हे “असंतुष्ट” फिर्यादी असल्याचं न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा पुरावा काय? गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का? अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव महितीवर आधारित आहेत, असेही कोर्टाने सुनावले.

“तुम्ही पोलीस आयुक्त आहात…तुमच्यासाठी कायदा बाजूला का ठेवायचा? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी कायद्यापेक्षा मोठे आहेत का? स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे,’ असंही हायकोर्टाने यावेळी खडसावलं.

गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशी विचारणा हायकोर्टाने परमबीर सिंह यांना केली. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात असे खडे बोल सुनावले. तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असाही प्रश्न कोर्टाने यावेळी उपस्थित केला.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh is arguing in the Mumbai High Court on a petition filed against Anil Deshmukh. Parambir Singh’s lawyer Vikram Nankani is defending him. Parambir Singh has filed a PIL in the Mumbai High Court against state Home Minister Anil Deshmukh. Mumbai High Court Chief Justice Dipankar Datta and Justice G.S. Kulkarni’s bench has started hearing.

News English Title: Former Mumbai police commissioner Parambir Singh plea at Mumbai high court against home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x