22 January 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

मोठा निर्णय | ६ हजार कोटी खर्चून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सगळ्या नागरिकांचं मोफत लसीकरण

vaccination

मुंबई, २८ एप्रिल | राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल.

आज (२९ एप्रिल) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेले अनेक दिवस मोफत लसीकरणावरुन वाद सुरु होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने राजकारण आणि विरोधी पक्ष तापलं होतं. मात्र, आता ठाकरे सरकाराने मोफत लसीकरण देण्याचा मोठा निर्णय दिला आहे

 

News English Summary: The Thackeray government has decided to provide free corona vaccine to the people of the state. The issue of free vaccination has been under discussion for the past few days. Such demands were being made from all levels. The decision was finally taken at today’s cabinet meeting. 5 crore 71 lakh citizens in the age group of 18 to 44 years will be vaccinated free of cost. This will require about 12 crore doses of vaccine. This will put a burden of Rs 6,500 crore on the state exchequer.

News English Title: Free corona vaccination for age between 18 to 44 in Maharashtra state news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x