Vihir Anudan Yojana | नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेतून मिळवा अनुदान

मुंबई, 29 मार्च | शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवणे झाली आहे.
या योजनेअंतर्गत नवीन विहीर तयार करण्याकरिता अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होते, तसेच जुन्या विहिरीचे नूतनीकरण करणे किंवा दुरुस्ती करण्याकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच, इन वेल बोरिंग 20 हजार, पंप संच 20 हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख व सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, संच 50 हजार किंवा तुषार सिंचन संच 25 हजार पीव्हीसी पाईप 30 हजार, परसबाग 500 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटला भेट द्या .
- उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय उपलब्ध असेल तिथे पर्यायावर क्लीक करा तो तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा.
- शेतकरी योजना हा पर्याय निवडा. मग पर्याय निवडल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ यावर क्लिक करा.
- या योजनेबाबत अनुदान पात्रता या सर्वांची माहिती दिसेल.
- उजव्या कोपऱ्यात नवीन ‘अर्जदार नोंदणी’ (Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर अर्ज करण्याकरिता अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा. लॉगिन प्रकार निवडून वापर ‘कर्ता आयडी’ किंवा ‘आधार क्रमांक’ (Aadhaar Number) टाका.
- त्यानंतर ‘प्रोफाईल स्थिती’ (Profile Status) हे वेब पेज ओपन होईल. तिथे ‘अर्ज करा’ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होइल त्यामध्ये शेवटचा पर्याय अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना (Special scheme for farmers) या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे उजव्या कोपऱ्यात बाबी निवडा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
- घटक निवडा या पर्यायावर तुम्हाला हवा तो ऑप्शन निवडा किंवा तुम्हाला कोणत्या कामाकरिता अनुदान हवे आहे, तो पर्याय निवडा उदाहरण: जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, ठिबक सिंचन संच, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यास अस्तरीकरण, (Lining the farm) नवीन विहीर इ. एक वेळेला एकच पर्याय निवडू शकता.
- त्यानंतर जतन करा पर्यायवर क्लीक करा. Ok बटन वर क्लीक करा.
- यानंतर तुम्हाला सोडत पद्धतीने म्हणजे लॉटरी पद्धतीने तुमचे नाव जाहीर होईल नाव जाहीर झाल्यास कागदपत्रे जमा करा. अर्ज करण्याकरिता कागदपत्रांची आवश्यकता नसते.
पात्र असणारे जिल्हे:
ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते परंतु मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA