15 November 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना TV आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे

Corona Virus, Radio TV, Education in India

मुंबई, २९ मे : कोरोना चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र लॉकडाऊन शिथिल केला तर संसर्गाची भिती अधिक आहे, आणि लॉकडाऊन असाच जारी केला तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत होणार आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे. म्हणूनच, वर्ग न भरवता शाळा करण्याच्या दिशे प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

त्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारनं दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. “राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे.

त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाच प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

News English Summary: Students will be given lessons on TV and radio in the coming academic year. For this, the state government has demanded 12 hours of television and two hours of radio.

News English Title:  Give 12 Hour Air Time On National Tv 2 Hour Radio Slot For School Lessons News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x