राज्यपालांच्या पत्रातील राजकीय भाषेवरून पवार संतापले | थेट पंतप्रधानांकडे तक्रार
मुंबई, १३ ऑक्टोबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
शिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी पत्रातून उपस्थित केला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सावधगिरी बाळगत मंदिरं पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात यावी याची विचारणा त्यांनी या पत्रातून केली.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष राज्याच्या राजकारणात डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती.
It was brought to my notice through the media, a letter written by the Hon. Governor of Maharashtra to the @CMOMaharashtra
In this letter the Hon. Governor has sought the intervention of the Chief Minister to open up religious places for the public. pic.twitter.com/1he2VOatx3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2020
In the very Preamble of our Constitution the word ‘Secular’ is added that equates and shields all religions and hence the Chair of the Chief Minister must uphold such tenets of the Constitution.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2020
News English Summary: Nationalist Congress Party chief Sharad Pawar has reacted strongly to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari’s letter to Chief Minister Uddhav Thackeray regarding the reopening of places of worship. The Shiv Sena ally wrote to Prime Minister Narendra Modi, saying he was “shocked and surprised” at the language used by the Governor. “I must mention here that I agree the Hon. Governor can have his independent views and opinions on the issue. I also appreciate the prerogative of the Governor to convey his views to the Chief Minister. However, I am shocked and surprised to see the letter of the Governor released to the media and the kind of language used in the letter,” he said in the letter to PM.
News English Title: Governors letter to CM like a political leader angry Sharad Pawar complains to Prime Minister News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON