17 April 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, ११ जून | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी शिवसेनेला पिंजऱ्यातला वाघ असे म्हटले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “काल चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांनी केक जास्त खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका. ते पिंजऱ्यातला वाघ म्हणतात. पण, वाघ हा शेवटी वाघच असतो. पिंजऱ्यातला असो की बाहेर. वाघाला पिंजऱ्यात का ठेवले जाते? उघडले की तुमच्यावर हल्ला करणारच ना. ठीक आहे पिंजऱ्याचा दार तुमच्यासाठी उघडा ठेवतो. या आतमध्ये, येऊनच दाखवा.” असे ते गंमतीने म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर हे एक राजकीय स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पडद्यामागून मदत केली होती. त्यात त्यांना यश देखील मिळाले. अनेक राष्ट्रीय नेते आणि पक्षांचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे पाहावे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News Summary: BJP state president Chandrakant Patil had a war of words with Shiv Sena MP Sanjay Raut on his birthday. The next day, Sanjay Raut took a spin off Patil. Yesterday was his birthday, he must have eaten more cake. “Don’t take them too seriously,” Raut said. He was speaking to reporters in Nandurbar.

News Title: He must have eaten more cake so do not take him too seriously said MP Sanjay Raut on Chandrakant Patil’s statement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या