25 December 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

कोरोना रिपोर्ट रुग्णांना मिळणार नाही, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कारण...

Covid 19 Report, Maharashtra, Rajesh Tope

मुंबई, १७ जून : कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली. तब्बल १३२८ मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या ८१ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम १४०९ ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर जन्म आणि मृत्यू नोंदविण्याचे जे निकष आहेत त्यानुसारच नोंदणी करण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं. या सगळ्या नोंदींची पडताळणी करूनच नवी संख्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. असे केल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी राज्यभरातून होतेय. याची आग्रहाची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याची किंमतही कमी ठेवावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर आहेत. तसेच राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. आम्हाला काहीही लपवायचे नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले. पाचशे व्हेंटीलेटरची मागणीही पंतप्रधनांकडे करण्यात आली आहे.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope clarified that the corona report will no longer be given directly to patients. In doing so, even a person with no symptoms is admitted to a private hospital with the report. They are given oxygen and ICU when they are not needed in a private hospital. So other patients don’t get seats.

News English Title: Health Minister Rajesh Tope clarified that the corona report will no longer be given directly to patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x