आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंकडून फडणवीसांना उत्तर
मुंबई, २९ ऑक्टोबर: केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तसंच यासंदर्भात याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
“राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारची योजना, केंद्राच्या निधीतून पण, राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणार्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर, कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप सुद्धा या पत्रासोबत जोडत आहे,” असं फडणवीस यांनी नमूद केलं आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टिकरण दिले आहे.
राजेश टोपे म्हणतात , राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे.राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या मंत्रीगटाने शिफारस केली होती. ही कार्यवाही गेल्या वेळेसच्या शासन काळातच सुरू झाली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती मला गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती.
मी तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये.राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित आहे.
News English Summary: The National Health Mission is implemented by the State Government with funds received from the Central Government. Former Chief Minister and Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis had sent a letter to Chief Minister Uddhav Thackeray alleging that about Rs 400 crore was being misappropriated in the name of making permanent appointments in the service. He has also demanded an inquiry into the matter in a letter.
News English Title: Health Minister Rajesh Tope reply to opposition leader Devendra Fadnavis News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS