22 December 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Supreme Court, Anil Deshmukh, Paranbir Singh

मुंबई, ८ एप्रिल: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी पंधरा दिवसांत संबंधित आरोपाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात या गोष्टीला आव्हान देण्यात आले होते. आज त्यावर न्यायमुर्ती संजय किसन कौल आणि हेमंत गुप्ता यांच्या दुहेरी पीठ सुनावणी करतील.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जी.एस. कुळकर्णी यांच्या खंडपीठाने सोमवारी सीबीआयला पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही तासांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यंमत्र्यांकडे सोपविला होता. दरम्यान बुधवारी मुंबई पोलिसातील कर्मचारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्र्यांवर लेटर बॉम्ब टाकत परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची पुष्टी केली. त्यामुळे आणखी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

News English Summary: Following the resignation of former state Home Minister Anil Deshmukh, a petition was filed in the Supreme Court by the Maharashtra government and Anil Deshmukh challenging the High Court decision. Former Mumbai Police Commissioner Parambir Singh had accused the former home minister of recovering Rs 100 crore a month. It was against this backdrop that he had approached the High Court seeking a CBI inquiry.

News English Title: Hearing on petition filed by former home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x